दिवा महोत्सवाची जोरदार तय्यारी सुरु, भरगच्च कार्यक्रमांनी साजरा होणार दिवा महोत्सव

ठाणे : प्रतिनिधी (निलेश घाग)

कोरोनाकाळात दिव्यातील थांबलेला उत्साह लोकांच्या मनात पुन्हा रुजविण्यासाठी लवकरच दिवा महोत्सव सुरु होत असून त्याची तयारी जोरदार सुरु आहे. गेल्या तीन वर्षानंतर प्रथमच दिव्यातील विविध कार्यक्रम,भजने,नृत्य अविष्कार,आर्क्रेस्टा खानावली व पुरस्कार तसेच समाजातील संस्कृती ,वैशिष्टपुर्ण परंपरा, आणि क्रिडा,कला,शैक्षणिक,सांस्कृतिक कार्यक्रमांचा बहारदार कार्यक्रमांची मेजवाणी घेवून येणारा हा दिवा महोत्सव असणार असल्याची माहीती संयोजक श्री रमाकांत मढवी आणि श्री उमेश भगत यांनी सांगितले.

बाळासाहेबांची शिवसेना पुरस्कृत धर्मवीर मित्र मंडळ आयोजित दिवा महोत्सव २०२२ येत्या २५ डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान होणार आहे.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती ठाण्याचे सुपूत्र आणि राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे,ठाण्याचे पालकमंत्री श्री शंभुराज देसाई,खासदार श्री श्रीकांत शिंदे यांची असणार आहे.तसेच ठाणे मनपाचे माजी महापौर श्री नरेश म्हस्के,आमदार रविंद्र फाटक,ठाणे शहरप्रमुख श्री रमेश वैती,माजी महापौर सौ.मिनाक्षी शिंदे,विधानसभा संघटक श्री ब्रम्हा पाटील,कल्याण जिल्हा प्रमुख श्री गोपाळ लांडगे,आमदार प्रताप सरनाईक,स्थायी समिती सभापती श्री राम रेपाळे,माजी महापौर श्री अशोक वैती,माजी नगरसेवक श्री राजन किणे,उद्योजक श्री अनंत पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.


दिवा महोत्सवाची रुपरेषा पुढीलप्रमाणे असणार


रविवार दि.२५ डिसेंबर २०२ रोजी सायं.५.४५ वा.उद्घाटन,सायं.६.०० ज्येष्ठ नागरिक सत्कार,साय.६.३० वा.श्री गणेश प्रा.भजन मंडळ,बुवा-श्री सुनिल परब,विष्णुस्मती प्रा.भजन मंडळ,बुवा-मयुर दळवी, साय.७.१०वा.श्री गणेश दर्शन स्पर्धेचे बक्षीत वितरण,साय.७.३० वा.जय माता दी ब्रास बँड पथक,नेवाळी,श्री मलंग गड,कल्याण.साय.८.००वा.सांस्कृतिक कार्यक्रम.,सायं.९.४० वाजता ३ (तीन)भाग्यवंत महिलांना पैठणी भेट,

सोमवार दि.२६ डिसेंबर २०२२ रोजी सायं.६.०० वा.ज्येष्ठ नागरिक सत्कार सोहळा,सायं.६.३० वा.गजानन प्रा.भजन मंडळ,बुवा-दयानंद मेस्त्री,सातेरी प्रा.भजन मंडळ,बुवा-श्री.जनार्दन पेडणेकर,सायं.७.१० वा.दिवा महोत्सव अंतर्गत चित्रकला स्पर्धेचे बक्षित वितरण समारंभ,सायं.७.३० वाजता गावदेवी कला सरगम ब्रास बँड पथक चौधरपाडा(शिवनगर),सायं.७.५० वा.सांस्कृतिक कार्यक्रम,सायं.९.४० वा.४ (चार) भाग्यवंत महिलांना पैठणी भेट

दिनांक २७ डिसेंबर २०२२ रोजी साय.६.३० वा.स्थानेश्वर प्रा.भजन मंडळ,बुवा-प्रथमेश घाडी,विघ्नहर्ता प्रा.भजन मंडळ,बुवा-श्री निलेश दळवी,साय.७.१० वा.१० वी व १२ वी ७५ टक्के गुण प्राप्त विद्यार्थांचा सत्कार सोहळा व दिवा मॅरेथाँन स्पर्धेचे बक्षिस वितरण समारंभ.सायं.७.३० वा.सरगम कला सर्कल ब्रास बँड पथक कचोरे कोळीवाडा,सायं.८.३० वा.सांस्कृतिक कार्यक्रम.सायं.९.४० वा.५ (पाच) भाग्यवंत महिलांना पैठणी भेट,

बुधवार दि.२८ डिसेंबर २०२२ रोजी साय.६.३० वा.विश्वकर्मा प्रा.भजन मंडळ,बुवा-सुहास मेस्त्री,सिद्धेश्वर प्रा.मृदूंगदास भजन मंडळ,बुवा श्री आनंद सावंत.सायं.७.१० वा.दिवा महोत्सव अंतर्गत निबंध स्पर्धेचा बक्षित वितरण सोहळा,सायं.७.३० वा.अग्निमाता ब्रास बँड पथक,टेमघर,भिवंडी,साय.८.०० वाजता.सांस्कृतिक कार्यक्रम,रात्रो.९.५० वा.६ (सहा) भाग्यवंत महिलांना पैठणी भेट.

गुरुवार दि.२९ डिसेंबर २०२२ रोजी सायं.६.३० वाजता ठाणेश्वर भजन मंडळ,बुवा-श्री स्वप्नील मेस्त्री,गुरुदत्त प्रा.भजन मंडळ,बुवा-श्री सुनिल गावडे,साय.७.२० वा.आदर्श माता पुरस्कार,रांगोळी स्पर्धेचे बक्षिस वितरण,साय.७.३० वा.नवतरुण ब्रास बँड पथक,दातिवली गाव,साय.७.४५ वा.आदर्श शिक्षक पुरस्कार,दिवी गुणीजन.,सायं.८ वाजता,सांस्कृतिक कार्यक्रम,सायं.९.४० वा.७(सात) भाग्यवंत महिलांना पैठणी भेट.


शुक्रवारी दि.३० डिसेंबर २०२२ रोजी साय.६.३० वा.सोमजाईदेवी प्रा.भजन मंडळ,बुवा-श्री रमेश शितकर,श्री देवी लिग रवळनाथ भजन मंडळ,बुवा-श्री सिद्धेश परब.,सायं.७.१० वा.श्री गणेश ब्रास बँण्ड पथक कासगाव बदलापूर.,साय.७.३० वा.जल्लोष २०२२, साय.८.१५ वा.दिवा भुषण,दिवा गौरव पुरस्कार वितरण सोहळा,साय.९.४० वाजता ८ (आठ) भाग्यवंत महिलांना पैठणी भेट

या महोत्सवाचे स्वरुप म्हणजे सुकी मासळी बाजार,पारंपारिक खाद्य स्टाँल,आकाश पाळणे,विविध खेळणी व इतर मनोरंजक बाबी तसेच आकर्षक खरेदीची संधी असून महोत्सवात सामील होणाऱ्या १ ते १० वयोगटातील बालकांची वाढदिवस असल्यास तो साजरा करण्यात येणार आहे.

दिवा महोत्सव यशस्वी करण्यासाठी महोत्सव समितीचे संयोजक ठाण्याचे माजी उपमहापौर श्री रमाकांत मढवी,श्री उमेश भगत,श्री शैलेश पाटील श्री गणेश मुंडे,श्री आदेश भगत,श्री अमर पाटील,सौ.दर्शना म्हात्रे,सौ.सुनिता मुडे,श्री दिपक जाधव,श्री शशिकांत पाटील,श्री निलेश पाटील,श्री गुरुनाथ पाटील,श्री अरुण म्हात्रे,श्री विजय भोईर,श्री धनंजय बेडेकर,सौ.सुप्रिया भगत,सौ.अर्चना भगत आदी माजी नगरसेवकांस संयोजन समितीते पदाधिकारी प्रचंड मेहनत घेत आहेत.

टिप्पण्या