उद्यापासून सर्व प्रकारच्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट अनिवार्य
नवी दिल्ली :- एक जानेवारीपासून सर्व प्रकारच्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट अनिवार्य करण्यात आली आहे. या प्लेट नसणार्या वाहनांना ५ ते १० हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
एक जानेवारीपासून सुरू होणार्या नवीन वर्षात जीएसटी, बँकिंगसह अनेक नियमांत बदल होत आहेत. त्यातला प्रमुख म्हणजे सर्व प्रकारच्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट अनिवार्य करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी न झाल्यास मोठा दंड आकारण्यात येणार आहे. नवीन नियमांनुसार १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आणि कलर कोडेड स्टीकर्स अनिवार्य करण्यात आले आहेत. याचे उल्लंघन करणार्यांना ५ ते १० हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे. हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटसाठी दर निश्चित करण्यात आले असून दुचाकी वाहनांना ३६५ तर चारचाकी वाहनांना ६०० ते ११०० रुपये खर्च येणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा