वाडीलिंबू सापुचेतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेवा वाऱ्यावर ; निलेश आखाडे भाजपा भ.वि.जि.अध्यक्ष
लांजा : प्रतिनिधी
सापुचेतळे-वाडीलिंबू प्राथमिक आरोग्यकेंद्र येथे आज दिनांक 27 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजता चिरा खाणीवर काम करणारी 5 महिन्याची गरोदर महिलेला वेदना होऊ लागल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेण्यात आले यावेळी या ठिकाणी कोणीही डॉक्टर उपस्थित नव्हते ही बाब काही ग्रामस्थांनी भारतीय सत्यशोधक संघाच्या कार्यकर्त्यांना कळविली हे कार्यकर्ते व भारतीय जनता पार्टीचे भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष काही कार्त्यांसह मिळून यांनी तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र येथे धडक देत तेथील डॉक्टर, तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी थेट संपर्क साधत येथे डॉक्टर उपस्थित का नाहीत? असा सवाल केला.
या प्रार्थमिक आरोग्य केंद्रात दोन डॉक्टर असताना देखील या ठिकाणी प्रत्यक्ष एकही डॉक्टर उपस्थित राहत नसल्याचे बाब लक्षात आली प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज इमारत असताना देखील या ठिकाणी डॉक्टर नसल्यामुळे आरोग्य व्यवस्था ही खिळखिळी झाली आहे. तेथील स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी डॉक्टर कधीच उपस्थित राहत नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे.
या विषयावर अनेकदा पाठपुरावा करून देखील या ठिकाणी डॉक्टर उपस्थित राहत नसल्याने भारतीय जनता पार्टी व सत्यशोधक संघाचे कार्यकर्ते आक्रमक झाले जोपर्यंत डॉक्टर या ठिकाणी येत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी ठिया देणार अशी भूमिका त्यांनी घेतली. मात्र जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मध्यस्थीनंतर कार्यकर्ते शांत झाले. जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी या गोष्टीची गांभीर दखल घेतली जाईल व संबंधितांवर कारवाई केली जाईल आणि यानंतर आरोग्य व्यवस्थेबाबत तक्रार येणार नाही या ठिकाणी जागरूकतेने व्यवस्थापन केले जाईल. आणि उद्याच प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन आपल्या समवेत बैठक घेऊ असे आश्वासन दिल्यामुळे या ठिकाणी तूर्तास आंदोलन न करण्याचा निर्णय जमलेल्या कार्यकर्त्यांनी घेतला.
आरोग्य केंद्राची इमारत असताना या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध राहणार नसतील आरोग्य सुविधा मिळणार नसतील तर गोठ्यातील जनावरे आरोग्य केंद्रात आणून बांधून असा इशारा उपस्थितांनी दिला.
किमान यानंतर तरी या ठिकाणी नियमित डॉक्टर उपस्थित राहतील व संबंधित दोषी निवासी आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाई होईल अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.
www.konkantoday.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा