महाराणी येसूबाई स्मारकासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू -सुहास राजेशिर्के

संगमेश्वर : प्रतिनिधी

संगमेश्‍वर तालुक्यातील शृंगारपूर या महाराणी येसूबाई यांच्या माहेरी त्यांचा स्मृतीस्तंभ व्हावा किंवा त्यांचे स्मारक व्हावे व या गावाची महती, इतिहास जागतिक नकाशावर यावी. येथे पर्यटक यावेत व हा ऐतिहासिक वारसा जतन व्हावा यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू असे महाराणी येसूबाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व सातारचे मा. उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी सांगितले.

युगनिर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची राजधानी सातरचे मा. उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी बुधवारी छत्रपती युवराज संभाजीराजे यांच्या सासुरवाडी शृंगारपूरचे लोकनियुक्त नवनिर्वाचित सरपंच विनोद बाबू पवार यांचा सत्कार केला. त्यासाठी ते खासदार सातारहून तेथे आले होते. सातारी कंदीपेढ्यांचा हार, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भगवा फेटा बांधून त्यांनी सरपंच श्री. पवार यांचा सन्मान केला. सातरच्या राजधानीकडून झालेला हा शृंगारपूरचाच सन्मान असल्याची भावना यावेळी निर्माण झाली. यावेळी नेरळचे शाखाप्रमुख रविंद्र कदम, शृंगारपूरचे शाखाप्रमुख सुशांत जाधव, ग्रा.पं. सदस्य प्रमोद देसाई, ग्रा. पं. सदस्या शामल, अशोक म्हस्के, अभिषेक सुर्वे, अमोल म्हस्के, विनोद म्हस्के, माजी सरपंच श्रेया पवार, अनंत पांचाळ, दत्ताराम पवार, पत्रकार सुभाष कम, तुषार जाधव, श्री. धुमाळ आदी उपस्थित होते

टिप्पण्या