देशाच्या पंतप्रधानानी भारतीय सैन्य दलात सुरू केलेल्या सुविधांमुळे तरुण वर्गाला भरतीची मोठी संधी - आमदार संजय केळकर
ठाणे : प्रतिनिधी (निलेश घाग)
भारतीय सैन्य दलात भरती होऊन लेफ्टनंट पदी निवड झालेल्या लेफ्टनंट स्वराज बने यांचा सत्कार समारंभाचे आयोजन ठाण्यातील सहयोग मंदिर सभागृह येथे शनिवारी शौर्य डिफेन्स अकॅडमी आणि महाराष्ट्र युवा क्रिडा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार संजय केळकर, मेजर प्रांजळ जाधव यांच्या हस्ते लेफ्टनंट स्वराज बने यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी मेजर सुभाष गावंड, महाराष्ट्र युवा क्रिडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल कदम, शौर्य डिफेन्स अकॅडमीचे संस्थापिका वैशाली म्हेत्रे, सुहास भोळे उपस्थीत होते.
कार्यक्रमाचे सुरुवात मेजर प्रांजळ जाधव, लेफ्टनंट स्वराज बने, महाराष्ट्र युवा क्रिडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल कदम, शौर्य डिफेन्स अकॅडमी संस्थापिका वैशाली म्हेत्रे, सुहास भोळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली.
या प्रसंगी आमदार संजय केळकर, मेजर प्रांजळ जाधव यांच्या हस्ते लेफ्टनंट स्वराज बने यांचा सत्कार करण्यात येऊन पुढील कारकिर्दी करिता शुभेच्छा देण्यात आल्या.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्यात भरती होण्याकरिता विविध सुविधा उपलब्ध केल्यामुळे तरुण वर्गाला मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. सैन्यात अधिकारी बनण्याकरिता शौर्य अकॅडमी मार्फत भरती पूर्व परीक्षा घेऊन तसेच योग्य मार्गदर्शन केले जाते. तसेच महाराष्ट्र युवा क्रिडा प्रतिष्ठान मार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकील्यावर स्वच्छ्ता मोहीम मोठ्या प्रमाणात घेतली जात असून एक समाज हिताचे कार्य या संस्थांच्या माध्यमातून होत असल्याचे आमदार संजय केळकर यांनी सांगून तरुण वर्गाला सैन्य भरतीत अधिकारी बनण्याकरिता शिक्षणावर जास्त लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला कार्यक्रम प्रसंगी आमदार केळकरांनी दिला.
राज्यातील गडकिल्ल्यांची स्वच्छ्ता आणि गडाची रक्षा करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे, किल्ल्यावर ट्रेकिंगचे आयोजन मागील कित्येक वर्षा पासून करत असून ट्रेकिंग मुळे आरोग्य फिट राहत असून महाराष्ट्र युवा क्रिडा प्रतिष्ठान मार्फत सैन्यात भरती होणाऱ्या युवक, युवतींना ट्रेकिंग बद्दल काही माहिती किंवा प्रत्यक्ष ट्रेकिंग करायची असेल तर योग्य ते मार्गदर्शन केले जाईल असे महाराष्ट्र युवा क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल कदम यांनी सांगितले.
देशाचे राष्ट्रगीत डिफेन्स कार्यक्रमामध्ये स्पिकरवर न लावता प्रत्यक्ष प्रत्येक नागरिकांनी मोठ्या आवाजात बोलून आपल्या देशाच्या राष्ट्रगीताचा प्रत्येकाला अभिमान असल्याचे मेजर प्रांजळ जाधव यांनी सांगितले. तसेच सैन्यात भरती होण्याकरिता डीसीप्लिन काय असते याची माहिती देऊन पुढील कार्यकाळात मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत कशी अभ्यासातून यश संपादन करण्यात येईल असे मेजर जाधव यांनी सांगितले.
लेफ्टनंट स्वराज बनेच्या जीवनावर
प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा सुवर्णा भोईर यांनी "स्वराज" ही कविता सादर केली. यावेळी उपस्थित सर्वांची मने भारावून गेली.
लेफ्टनंट स्वराज बने खूप खडतर जीवन प्रवासामधून अभ्यास करत कठीण परिश्रमातून त्याने आपली सैन्य दलात भरती होण्याची जिद्द न सोडून अखेर तो सैन्य दलात भरती होऊन लेफ्टनंट पदावर त्याची निवड झाल्याने शौर्य डिफेन्स अकॅडमीच्या संस्थापिका वैशाली म्हत्रे यांनी त्याचे खूप कौतुक केले.
सैन्य दलात भरती झाल्यानंतर आपल्या रेजिमेंट सोबत कसे राहायचे तसेच अजून पुढील कार्यकाळात अजून अभ्यास करून अजून मोठ्या पदापर्यंत कशी मजल मारायची असा गोड सल्ला मेजर सुभाष गावंड यांनी कार्यक्रम प्रसंगी दिला.
कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असलेल्या मान्यवरांचे आभार प्रदर्शन सुहास गोळे यांनी करून
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुचिरा जोशी, डॉ. मयुरेश जोशी यांनी केले.
याप्रसंगी प्रतिष्ठानचे सल्लागार सदाशिव गारगोटे,
उपाध्यक्ष प्रज्ञा जाधव, संपर्क प्रमुख नम्रता पाटील, प्रदीप भोईर, प्रिया जगदाळे तसेच मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा