आई जीवदानी भजन मंडळाच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त रेल्वे प्रवासी भजन स्पर्धा आणि विविध कार्यक्रम आयोजन.


मुंबई : प्रतिनिधी

१४ वा वर्धापनदिन निमिताने भव्यदिव्य रेल्वे प्रवासी भजन स्पर्धा रविवार दिनांक २५ डिसेंबर २०२२ रोजी साईछाया विद्यालय, जिजामाता नगर, मोरेगाव, नालासोपारा पूर्व येथे सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन आई जीवदानी भजन मंडळाकडून करण्यात आले आहे. 

मुंबईची रक्तवाहिनी मानली जाणारी रेल्वे प्रवासातील मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वे भजन स्पर्धेत अव्वल नंबर पटकावून मंडळाला मानाचे स्थान निर्माण केले आहे. भजनाचा वसा जपणारे पश्चिम विभाग मधील भजन मंडळ म्हणून आई जीवदानी भजन मंडळ, विरार यांच्या कडे पहिले जाते. या मंडळाची स्थापना मंडळाचे संस्थापक राजेंद्र धोपट माऊली यांनी २००९ साली गंगाराम ठोंबरे, अध्यक्ष प्रवीण जाधव, उपाध्यक्ष राजेंद्र मोहिते, सचिव रामचंद्र कोतवडेकर, उपसचिव अजित कांबळे, खजिनदार कृष्णा सुर्वे, कार्याध्यक्ष समीर अपराज, सह कार्याध्यक्ष शाहीर नितीन रसाळ, सदस्य अर्जुन नलावडे, हरेश मांडवकर, विनायक रसाळ, योगेश लीगम, विनायक धावडे, अरुण खाकम, प्रमोद भडसाळे, गौरव नवाळे, अमर पाटणकर यांच्या  मदतीने केली. शैक्षणिक, कला, क्रीडा, आरोग्य विषयक क्षेत्रात महत्वपूर्ण उपक्रम राबवले आहेत. रेल्वे प्रवासात भजन सेवा करताना गायनांनी मंत्रमुग्ध करणारे हिरे म्हणून महादेव लोखंडे, नितेश आंबेकर माऊली, बाबली म्हाडगुत माऊली, दर्शन नवाळे यांच्यासारख्या गोड सुमधुर वाणीच्या गायकांनी तर अनेकांची मने जिंकली.

 वैकुंठवासी प्रकाश दळवी यांचे मोलाचं मार्गदर्शन मंडळाला लाभलं. तसेच समाजकार्यात हातखंडा असलेले शाहीर नितीन रसाळ आणि सर्वच सहकारी यांनी तर या कार्यात स्वतःला वाहूनच घेतलं आहे. अशा दैदिप्यमान १४ वा वर्धापन दिन सोहळ्या निमित्ताने -कौटुंबिक स्नेहसंमेलन- श्री सत्यनारायणाची महापूजा- द्वितीय भव्य दिव्य रेल्वे प्रवासी भजन स्पर्धा नियोजन करण्यात आले. श्री संत सेवा समिती भजन सामाजिक संस्था (रजि.), संत ज्ञानेश्वर माऊली भजन सामाजिक संस्था, विठू माऊली सेवा समिती मध्य रेल्वे, नवविधा भक्ती सेवा समिती हार्बर रेल्वे या संस्थेच्या सलग्न लोकल प्रवासी भजनी मंडळे व भजन प्रेमी रसिक, सहप्रवासी, हितचिंतक आणि सामजिक कार्यकर्ते यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाकडून करण्यात येत आहे.

टिप्पण्या