आशा शिंदे यांची दलित पँथर च्या बी.आर.नगर महिला प्रभाग अध्यक्ष पदी निवड
दिवा : प्रतिनिधी
दलित पँथर च्या केंद्रीय कार्यालयात पद्मश्री नामदेव ढसाळ साहेब पक्षश्रेष्ठी मल्लिका ताई ढसाळ यांच्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.रामभाऊ तायडे साहेब यांच्या हस्ते दलित पँथर दिवा शहर उपाध्यक्ष राहुल शिंदे यांची मातोश्री आशा शिंदे यांची दलित पँथर च्या बी.आर.नगर महिला प्रभाग अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. त्या वेळेस महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्ष कविता मगरे , ठाणे शहर अध्यक्ष जयेश बनसोडे , ठाणे माजीवाडा विभाग अध्यक्ष त्रिशाला व्हवळ , दिवा शहर महिला सचिव संजना पलांडे , दिवा शहर महिला संघटक श्वेता खांबे , साबे गाव छावनी अध्यक्ष वैशाली इंगोले व इतर वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा