जो न्याय रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्याना तोच उर्वरित महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना असला पाहिजे – शेखर निकम

गुहागर : प्रतिनिधी

कोकणातील बागायतदार शेकतऱ्यांना महावितरणचा वेगळा दर लावून चारपट वसुली केली जात आहे. आणि उर्वरित महाराष्ट्रावर मात्र महावितरण मेहरबान होत त्याना वेगळा दर लावण्याचे काम करण्यात आले आहे.  कोकण  खास करून रत्नागिरी जिल्ह्यातील बागायतदार शेतकऱ्यांकडून वाढीव वीज बिल वसुली करणाऱ्या महावितरण विरोधात आ. शेखर निकम यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्याचे विरोधीपक्ष नेते ना अजित पवार यांची भेट घेऊन कैफियत मांडली आहे. तर महावितरणचे एमडी विजय सिंघाल याना याविषयी जाब विचारण्यात आला आहे. तर आ. निकम यांनी अधिवेशनात ही विषय लावून धरला आहे. 

कोकण खास करून रत्नागिरी जिल्ह्यात आंबा, काजू ,नारळ, सुपारी, चिकू आदी फळपिके कोकणात घेतली जात आहेत याना पाणी पुरवठा करण्यासाठी शेतकऱ्यांनी महावितरणकडून “एजी” अंतर्गत पंप कनेक्शन घेतली आहेत. मुळात संपूर्ण महाराष्ट्रात फळपिके घेतली जात आहे. आणि त्या बागायतींना महावितरण कडून पाण्यासाठी वीज कनेक्शन देण्यात आली आहेत वीज कनेक्शन आणि वीज दर हा संपुर्ण महाराष्ट्र मध्ये एकच असताना कोकण खास करून रत्नागिरी जिल्ह्यासाठी मात्र सुलतानी दर ठेवण्यात आल्याचे उघड झाले असून चार पट दराने लाखो रुपये महावितरण विभागाने वसूल केले असल्याचे आ. शेखर निकम यांनी सामोरी आणले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील बागायतदार शेतऱ्याला चार पट दर परिपत्रकानुसार देताना उर्वरित महाराष्ट्रात ऊस ,संत्री, द्राक्ष, केळी, आदी फळपीकांच्या बागायतदारांना मात्र मेहरबानी होत सवलतीचा दर लावण्याचे काम महावितरण कंपनीने केले असल्याचे समोरी आले आहे .  आ. शेखर निकम यांनी महावितरणचा हा कारभार आणि कोकण रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यावर होणारा अन्याय विरोधात जोरदार आवाज उठवला आहे. जो न्याय रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्याना तोच उर्वरित महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना असला पाहिजे अन्यथा उर्वरित महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लावलेला दर लावा, अशी मागणी आ निकम यांनी केली आहे. Increased power tariff for Konkan by Maha distribution

टिप्पण्या