जिद्द मतिमंद शाळेची संरक्षक भिंतीचे काम अवघ्या दोन महिन्यात पूर्ण;भाजप नेते व माजी खासदार निलेश राणे यांनी केली वचनपूर्ती

संस्थेच्या सचिव सुमती जांभेकर यांनी मानले आभार 

चिपळूण  - भाजपा प्रदेश सचिव व माजी खासदार निलेश राणे यांनी जिद्द मतिमंद शाळेला संरक्षक भिंत बांधून देण्याचा दिलेला शब्द अवघ्या दोन महिन्यातच पूर्ण केला आहे. विशेष म्हणजे कोणताही शासकीय निधी न वापरता स्वखर्चाने ही भिंत बांधून दिली आहे. संस्थेच्या सचिव श्रीमती सुमती जांभेकर, मुख्याध्यापक प्रदीप दिवाडकर यांनी समाधान व्यक्त केले आहे. ‘देतो, करतो हा शब्द राणे कुटुंबियांकडे नसल्याचे मत जांभेकर यांनी व्यक्त केले आहे.विद्यार्थ्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने ही भिंत महत्वाची असल्याने निलेश राणे यांचे ऋण व्यक्त करावे तितके कमीच आहे, अशा शब्दात आपली भावना ‘प्रहार’शी बोलताना बोलून दाखवली.
भाजपा प्रदेश सचिव व माजी खासदार निलेश राणे दोन महिन्यापूर्वी चिपळूण दौऱ्यावर आले होते. यावेळी कोवॅस संचलित जिद्द मतिमंद शाळेला सदिच्छा भेट दिली. या शाळेसाठी वॉटर फ्युरिफायर भेट देण्यात आला. शाळेचे शिक्षक उमेश कुचेकर यांनी आपल्या खास शैलीत सुत्रसंचालन करताना उपस्थितांच्या नावाबद्दल उल्लेख करवून घेताना निलेश राणे यांचा ‘दादा’ असा उल्लेख केला. तर यावेळी विद्यार्थ्यांचा वाढदिवसदेखील साजरा करण्यात आला. तर संस्थेच्या सचिव श्रीमती सुमती जांभेकर यांनी शाळेसाठी काही मागण्यांचा उल्लेख केला. यामध्ये शाळेच्या इमारतीसमोर संरक्षक भिंतीची गरज असल्याचे बोलून दाखवले. यावर निलेश राणे यांनी आपल्या मनोगतात आपली मागणी पूर्ण केली जाईल, असे सांगताना उद्यापासूनच कामाला सुरूवात होईल, असा शब्ददेखील दिला आणि अवघ्या दोन महिन्यातच या भिंतीचे कामदेखील पूर्ण झाले आहे. एकंदरीत भाजपा प्रदेश सचिव व माजी खासदार निलेश राणे यांनी जिद्द मतिमंद शाळेला दिलेला शब्द पूर्ण केला आहे.
याबद्दल संस्थेच्या सचिव सुमती जांभेकर यांच्याशी संपर्क साधला असता राणे यांनी अवघ्या काही महिन्यातच आम्हाला दिलेला शब्द पूर्ण केला आहे. अन्य राजकीय लोकांसारखे ‘देतो-करतो’ असे काही केले नाही. तर उलट शाळेसमोर संरक्षक भिंतीचे काम स्वखर्चातून पूर्ण करून दिले आहे. शाळेसाठी विशेष म्हणजे विद्यार्थ्यांसाठी ही संरक्षक भिंत महत्वाची होती. या भिंतीमुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे, याचे आम्हाला समाधान आहे. या कामासाठी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे व नगरसेवक परिमल भोसले यांनीदेखील महत्वपूर्ण सहकार्य केल्याचे सांगितले.
मुख्याध्यापक प्रदीप दिवाडकर यांच्याशी संपर्क साधला असता भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी आमच्या कोवॅस संस्थेच्या जिद्द मतिमंद मुलांच्या शाळेला सदिच्छा भेट देऊन संस्थेची व दिव्यांग क्षेत्रात काम करत असलेल्या सर्व उपक्रमांची माहिती करून घेतली. या सदिच्छा भेटीत आपल्या मनोगतात जिद्द शाळेला जे जे सहकार्य लागेल, ते देण्याची ग्वाही दिली. २०२१ च्या महापुरात संस्थेच्या इमारतीच्या मागील व पुढील संरक्षक भिंती पूर्णपणे कोसळून नामशेष झाल्या होत्या. त्यामुळे या भेटीत आपल्या मनोगतात क्षणाचाही विलंब न लावता राणे यांनी इमारतीच्या समोरील संरक्षक भिंतीचे काम उद्यापासून सुरू करा, असे आपल्या सहकाऱ्यांना सांगितले, त्याप्रमाणे केवळ दोन महिन्यात संरक्षक भिंत उभी राहिली. संस्थेत जवळ जवळ ९० दिव्यांग मुले शिक्षण-प्रशिक्षण घेत आहेत. महापुरानंतर गेले वर्षभर संस्थेसमोर सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला होता, पण निलेश राणेंच्या माध्यमातून संस्थेला देवमाणूस भेटले व संरक्षक भिंत पूर्ण झाली, अशा शब्दात दिवाडकर यांनी आपली भावना व्यक्त केली आहे.

टिप्पण्या