नाताळ निमित्ताने नालासोपारा विद्याभूषण मराठी/हिंदी विद्यालय मध्ये संस्कृतीका कार्यक्रमाचे आयोजन.

प्रतिनिधी :- नालासोपारा

नाताळ निमित्ताने विद्याभूषण मराठी/हिंदी विद्यालय नालासोपारा पूर्व येथील शाळे मध्ये वेशभूषा, डान्स आणि मुलांना आनंद देणारे  विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या शाळेमध्ये सर्व नाताळ सहित इतर सणहि मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. 

दिनांक २५ डिसेंबर म्हणजे नाताळ!, येशू ख्रिस्ताचा जन्म म्हणून जगभरात हा दिवस साजरा केला जातो. ब्रिटीश काळापासून नालासोपारा, वसई आणि विरार मध्ये नाताळ सण मोठ्या उत्सहात साजरा करण्याची परंपरा येथे असल्याने, येथिल सर्व शाळांमध्ये मोठया उत्साहाने नाताळ सण साजरा केला जातो. परस्परातील राग, मत्सर विसरुन सर्वांमध्ये आपुलकी, प्रेम नांदावे हा येशुचा संदेश देण्यासाठी ख्रिसमसच्या निमित्ताने विद्याभूषण मराठी आणि हिंदी विद्यालया मध्ये वेशभूषा, विविध डान्स कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सेंट मॅथ्यु ट्रस्टचे अध्यक्ष विल्सन डिसोझा सर यांच्या कडून सर्व विध्यार्थी शिक्षक यांना शुभेच्छा  देण्यात आल्या तसेच विद्यार्थ्यांना केक व खाऊचे वाटप करण्यात आले.  

आपल्या भारतात अनेक जाती धर्माचे लोक आनंदाने एकजुटीने राहतात, एक मेकांच्या सुख दुःखात, सहभागी होतात, याचेच’ नाताळ सण” हे मोठे उदाहरण विद्याभूषण मराठी/हिंदी विद्यालयामध्ये पाहायला मिळाले. यावेळी या विद्यार्थ्यांसोबत शाळेचे संचालक विल्सन डिसोझा सर, ग्लोरिया मिस, ब्रिजल मिस, भाग्यश्री केणीमिस, शशीकला परेरामिस, वैशाली चव्हाण मिस, राजेंद्र सर, रेखा तिवारी मिस, कविता शुक्ला मिस, राजेश सर, इंद्रेस सिंग सर, नयना मिस, माया मिस आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पण्या