दिवा महोत्सवाची आजपासुन धूम २५ ते ३० डिसें. या कालावधीत बहारदार कार्यक्रमांची मेजवानी

ठाणे : प्रतिनिधी (निलेश घाग)

धर्मवीर मित्र मंडळ आयोजित दिवा महोत्सव -२०२२ चे आयोजन २५ डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान दिवा-शिळ रोड येथे करण्यात आले आहे. या महोत्सवाचे यंदा १४ वे वर्ष असुन दिव्यातील विविध कार्यक्रम, भजने, नृत्य अविष्कार, ऑर्केस्ट्रा, खाद्यसंस्कृती व पुरस्कार तसेच समाजातील संस्कृती, वैशिष्टपूर्ण परंपरा, आणि क्रीडा, कला, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रमांच्या बहारदार कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे.त्याचबरोबर युवा किर्तनकार ह.भ.प.कु.वैष्णवी महाराज,दातिवली गाव यांच्या सुश्राव्य किर्तनाचा लाभ भाविकांना घेता येणार आहे.

    दिवा-शिळ रोडवर होणाऱ्या या आगळ्यावेगळ्या महोत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाण्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई, खासदार श्रीकांत शिंदे यांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच ठाणे मनपाचे माजी महापौर नरेश म्हस्के, आमदार रविंद्र फाटक, ठाणे शहरप्रमुख रमेश वैती, माजी महापौर मिनाक्षी शिंदे, विधानसभा संघटक ब्रम्हा पाटील, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, आमदार प्रताप सरनाईक, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, माजी महापौर अशोक वैती, माजी नगरसेवक राजन किणे, उद्योजक अनंत पाटील आदीसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

  दिवा विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या परिसरातील समाजाच्या संस्कृतीचे जतन करणे, संवर्धन करणे या उद्देशाने सहा दिवस दिवा महोत्सवाचे आयोजन  करण्यात आले आहे. महोत्सवामध्ये समाजातील संस्कृतीचे, प्रगतीशील वाटचालीचे तसेच वैशिष्टपुर्ण परंपरा व आगळेवेगळे चित्र साकारले जाणार असुन दररोज समाजातील बंधु-भगिनींच्या कलाविष्काराने नटलेल्या बहारदार कार्यक्रमासह कला, क्रिडा, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवात एकुण ३३ भाग्यवंत महिलांना पैठणी प्रदान करण्यात येणार असुन विभागातील गुणवंतांना

दिवा भूषण, दिवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.या महोत्सवात सुकी मासळी बाजार, पारंपारिक खाद्य स्टॉल, आकाश पाळणे, विविध खेळणी व इतर मनोरंजक बाबी तसेच आकर्षक खरेदीची संधी असून महोत्सवात सामील होणाऱ्या १ ते १० वयोगटातील बालकांचा वाढदिवस असल्यास तो साजरा करण्यात येणार आहे.

   दिवा महोत्सव यशस्वी करण्यासाठी महोत्सव समितीचे संयोजक ठाण्याचे माजी उपमहापौर रमाकांत मढवी, उमेश भगत, शैलेश पाटील, गणेश मुंडे, आदेश भगत, अमर पाटील, दर्शना म्हात्रे, सुनिता मुंडे, दिपक जाधव, शशिकांत पाटील, निलेश पाटील, गुरुनाथ पाटील, विजय भोईर, धनंजय बेडेकर, सुप्रिया भगत, अर्चना भगत आदी माजी नगरसेवकांस संयोजन समितीते पदाधिकारी प्रचंड मेहनत घेत आहेत.तरी सर्वांनी या महोत्सवास भेट देवून समाजातील संस्कृतीच्या विविध पैलूंचे अवलोकन करावे.असे आवाहन संयोजक रमाकांत मढवी यांनी केले आहे.

टिप्पण्या