जिते ते आपटा या दोन रेल्वे स्थानकाच्या दरम्यान रुळाला तडे,कोकण रेल्वे मार्गावर एक मोठी दुर्घटना होण्यापासून टळली
कोकण रेल्वे मार्गावर एक मोठी दुर्घटना होण्यापासून काल टळली. पेण नजीक रेल्वे रुळाला तडे जाऊन रुळाचा काही भाग तुटला होता. मात्र रेल्वे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला आहे.पेणवरून पनवेल ला जाणाऱ्या रेल्वे रुळाला जिते ते आपटा या दोन रेल्वे स्थानकाच्या दरम्यान रुळाला तडे जाऊन रुळाचा काही भाग तुटला होता. शुक्रवारी या मार्गावर रेल्वे जाण्यापूर्वी रेल्वे कर्मचारी रुळाची पाहणी करीत असताना त्यांना 6 वाजून 22 मिनिटांच्या दरम्यान सदर प्रकार आढळला. याबाबत रेल्वे कर्मचाऱ्यानी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना तातडीने सुचित केले. त्यानंतर कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली. त्यामध्ये तातडीने काल सकाळी 5 वाजून 15 मिनिटांनी दिवा स्थानकातुन सुटणारी रोहा - दिवा या मेमु रेल्वेला जिते रेल्वे स्थानका नजीक थांबविले. यानंतर मडगाव - नागपूर स्पेशल रेल्वे, पेण येथून सकाळी 6:45 ला सुटणारी पेण - दिवा मेमु रेल्वे व मँगलोर- मुंबई रेल्वे या चार गाड्यांना रोखण्यात आले.
त्याचवेळी रेल्वे रूळ दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवरती सुरू करण्यात आले. सकाळी 7:30 वाजता रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले. . 10 ते 30 किलोमीटर प्रतितास या वेगाने सदर रुळावरून रेल्वे पुढे पाठविण्यात आल्या. थंडीमुळे रेल्वे रुळाला तडे जाण्याचे प्रकार घडत असतात अशी माहिती यावेळी रेल्वे प्रशासनाकडून कडून देण्यात आली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा